ठाणे (प्रतिनिधी ) : राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी अवैध दारू विक्री आणि बार चालविणाऱ्यांना चांगलाच धडा शिकविला होता मात्र ठाण्यातील वर्तकनगर भागातील अवैध दारू विक्रीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे या भागात चांगलेच बळ वाढले असून पोलिसांचा त्यांच्यावर दबाव आहे की नाही असा संतापजनक सवाल वर्तकनगर भागात राहणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे, याचे कारण म्हणजे कोणत्याही भीतीशिवाय वर्तकनगर भागात दारूचे बार सुरू असून त्याठिकाणी दोन अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असल्यास यावेळी कळाले आहे, त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून याठिकाणी राहावे लागत आहे.
धक्कादायक न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार वर्तकनगर भागात अवैध दारू विक्री, अनधिकृत हुक्का पार्लर आणि डान्सबार सुरू असल्याचे कळाले आहे. डान्सबार आणि इतर अवैध धंद्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे स्वर्गीय आर आर पाटील यांनी ही सर्व अवैध धंदे करणाऱ्यांना हद्दपार केले होते मात्र सुसंस्कृत ठाण्यात डान्सबार आणि अवैध दारू विक्रेत्यांनी मात्र धुमाकूळ घालण्यास सुरू केले आहे. राज्यातील अनेक भागात विविध अनधिकृत धंदे चालत असतील पण ठाण्यात अश्या संस्कृतीने आपला प्रभाव दाखवला नव्हता मात्र गेल्या काही महिन्यात ठाण्यात हुक्का पार्लर, डान्सबार आणि अवैध दारू विक्रेत्यांनी मात्र धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हे सर्व थांबविण्यासाठी आणि या अवैध धंदे करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची गरज आहे
