मुंबई (प्रतिनिधी ) : धक्कादायक न्यूजच्या प्रतिनिधीकडून दादर येथील एका भागात मटका आणि जुगार बिनधास्त सुरु असल्याची बातमी देण्यात आली होती तर या जुगार अड्ड्याची स्टिंग ऑपरेशन आमच्या टीमकडून करण्यात आले होते. हे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ आमच्या ट्विटर हैंडलवर प्रकाशित करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसच्या एसएस शाखेकडून या जुगार अड्ड्यावर धाड़ टाकण्यात आली आणि मटका माफियांना यावेळी अटक करण्यात आली आहे. यावेळी १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दादर शिवाजी पार्क पोलिस स्टेशन अंतरगर्त येणाऱ्या क्रांतिसिंग नाना मंडई जवळ दादर येथे सरासपणे मटका, जुगार सुरु होते. आमच्या टीमकडून स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या एसएस ब्रांचकडून धाड़ टाकण्यात आली आणि १३ आरोपींना यावेळी अटक करण्यात आली आहे. ४४ हजार रोख रक्क्म आणि जुगार संदर्भातील कागदपत्रे यावेळी जप्त करण्यात आली आहे.